लेटेस्ट जाहिराती

लॉग इन करा....

मुंबईतील राज्य राखीव पोलीस बल बल क्र. 8 मध्ये 25 जागा

मुंबईतील राज्य राखीव पोलीस बल बल क्र. 8 मध्ये चतुर्थ श्रेणीतील भोजन सेवक (8 जागा), धोबी (1 जागा), सफाईगार (4 जागा), न्हावी (1 जागा), मोची (3 जागा), शिंपी (4 जागा), कक्ष सेवक (2 जागा), कुक (1 जागा), रुग्णालयीन सेवक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 22 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महिला व बालविकास आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 195 जागा

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या महिला व बालविकास आयुक्तालयाच्या आस्थापनेवर परिविक्षाधीन अधिकारी (23 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), सांख्यिकी सहायक/वरिष्ठ लिपिक (36 जागा), कृषि सहायक (3 जागा), कनिष्ठ लिपिक/कनिष्ठ सहायक/लेखा लिपिक (32 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (37 जागा), शिक्षक (16 जागा), स्वयंपाकी (16 जागा), कनिष्ठ काळजी वाहक (21 जागा), पहारेकरी (2 जागा), वॉर्डबॉय/परिचर/कक्षसेवक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2014 आहे. अधिक माहिती http://wcdexam.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सोलापूरमधील राज्य राखीव पोलीस दलात चतुर्थ श्रेणीच्या १० जागा

सोलापूर येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 10 मध्ये सरळसेवेद्वारे स्वयंपाकी (4 जागा), धोबी (१ जागा), मोची (३ जागा), न्हावी (२ जागा) ही जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 21 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात 135 जागा

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अस्थायी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी (23 जागा), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (3 जागा), अधिपरिचारिका (19 जागा), ए.एन.एम. प्रसविका (74 जागा), फार्मासिस्ट (7 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (7 जागा), क्ष किरण सहाय्यक (1 जागा), समुपदेष्टा (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांच्या थेट मुलाखती दि. 1 ऑगस्ट 2014 ते 5 ऑगस्ट 2014 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 22 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट क्र. १ मध्ये चतुर्थ श्रेणीच्या १६ जागा

पुणे येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 1 मध्ये सरळसेवेद्वारे स्वयंपाकी-भोजन सेवक (11 जागा), धोबी (१ जागा), चपराशी (१ जागा), सफाईगार (१ जागा), न्हावी (२ जागा) ही जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात सोलापूरच्या दै. पुढारीमध्ये दि. 21 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.